Header Ads Widget

नायगाव तहसीलच्या कार्यक्षेत्रातील जनतेनी पावसाची गंभीरता पाहता सर्वांनी अलर्ट राहण्याचे तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांचे आवाहन !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील गोदावरी काठा वरील व पुनर्वशीत गावातील लोकांनी पावसाची गंभीरता पाहता अलर्ट राहण्याचे आवाहन नायगावच्या कर्तव्य दक्ष तहसीलदार डॉ धम्म प्रियाताई गायकवाड यांनी केले आहे 

तालुक्यातील गोदावरी काठा वरील व पुनर्वशीत गावातील व जुन्या गावात कोणत्या ही नागरिकांनी आपले जनावरे घेऊन थांबू नये कारण पावसाची गंभीरता पाहता पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे आपण सुरक्षित ठेवून थांबावे असे तहसीलदार यांनी सांगितले आहे

तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कुठे ही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ तहसील विभागातील कोणत्या ही कर्मचाऱ्यांशी व तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांच्याशी संपर्क करावा असे ही आवाहन करण्यात येत आहे 

सध्याच्या परिस्थिती मध्ये पावसाची गंभीरता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रात्री बे रात्री आपले जनावरे घराकडे आणण्यासाठी कोणी ही पाण्यातून प्रवास करू नये व आपले जनावरे अगोदरच सुरक्षित ठिकाणी आणून बांधून ठेवावे असे नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांनी कळविले आहे 
 
नायगावच्या तहसीलदार धम्मप्रियाताई गायकवाड यांना संपर्कासाठी त्यांचा मोबाईल नंबर जारी केला असून तो मोबाईल नंबर ९९७०६३५०२२ संपर्क करावा असे ही आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments