नायगावच्या पंचायत समिती कार्यालयाच्या घरकुल विभागात कर्मचाऱ्याचा आनागोंदी कारभार गेल्या ७ महिन्या पासून पाहिलाच हप्ता पडत नसल्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांचे बेहाल होताना दिसून येत आहे
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व नायगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी घरकुल विभागा कडे जास्तीचे लक्ष देण्याची गरज आहे
तालुक्यात शासनाने पंतप्रधान आवास योजनेचे घरे मोठे थाटाने दिले परंतु नायगाव पंचायत समितीच्या कार्यालयातील बेरजबाबदार कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षणामुळे घरकुलधारकाला पहिलाच हप्ता मिळत नसल्यामुळे घर बांधण्याचे थांबले आहेत
पंचायत समितीच्या घरकुल विभागातील कर्मचारी फोन उचलत नाहीत एका जबाबदार कर्मचाऱ्यांचा फोन सतत बंद येतो तर एका महिला कर्मचाऱ्यांचा फोन लागून सुद्धा उचलत नसल्यामुळे लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्या साठीच परेशान व्हावे लागत आहे

0 Comments