नायगावच्या पंचायत समितीच्या घरकुल विभागात सदरील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चालत असल्यामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाच्या संदर्भातील बिले टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात हेळसांड करत असल्यामुळे लाभार्थी वर्ग चांगलेच वैतागले आहेत
तालुक्यातील नायगाव पंचायत समितीच्या घरकुल विभागातील सदरील कर्मचाऱ्यांना लाभार्थ्याचे फोन उचलण्यासाठी एलर्जी होत आहे की काय ? असा प्रश्न जनसामान्य माणसाला पडला असून अनेक घरकुल धारकांचा पहिलाच हप्ता पडत नसल्यामुळे लाभार्थ्यातून संताप व्यक्त केला जात आहे
पंचायत समिती कार्यालय नायगावच्या घरकुल विभागातील कर्मचाऱ्यांची नावालाच नेमणूक केली की काय असा ही प्रश्न उद्भभवला जात असून गटविकास अधिकारी यांनी या विभागाकडे लक्ष देण्याची गरज आहे
खरे तर या पंचायत समिती कार्यालयाच्या घरकुल विभागात गेल्या अनेक महिन्या पासून आंधळ जळतय कुत्र पीठ खातोय असी गत निर्माण झाली आहे
या विभागात सदरील घरकुलाचे पहिले बिले टाकण्यासाठी चांगल्या जबाबदार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे
पंचायत समिती कार्यालयाच्या घरकुल विभागातील कर्मचाऱ्यांचे फोन लागत नाहीत लागले तर ते उचलत नाहीत घरकुल धारक फोन उचलत नसल्यामुळे ते हैरान होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments