Header Ads Widget

लालवंडी गावात गेल्या तीन ते चार दिवसापासून एअरटेल व जिओ आणि वोडाफोन टावरची रेंज नसल्यामुळे नागरिकात संताप !!

     मारोती कोम्पलवार 
नायगाव तालुक्यातील मौजे लालवंडी येथील गावात गेल्या तीन ते चार दिवसा पासून एअरटेल व जिओ आणि वोडाफोनच्या टावरची रेंज नसल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केला असून सदरचे मोबाईल टॉवर हे शोभेची वस्तू बनली आहे 

 नायगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या कार्यकाळात म्हणजे दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे मौजे लालवंडी  आय एन १०९३१७७ तालुका नायगाव येथील इंडस टॉवर्स लि. चे टॉवर मध्ये पुराचे पाण्याखाली गेले आहे 

लालवंडी येथील टॉवर मधील डि. जी., बॅटरी बॅंक, पॉवर प्लान्ट, एस. पी. एस. व वोडाफोन बी. टी. एस. इत्यादी उपकरणे पाण्याखाली गेल्यामुळे संपुर्ण टॉवर बंद पडले असल्यामुळे सदरच्या यंत्रणेने लवकरात लवकर दुरुस्त करून लोकांना सेवा द्यावी असी मागणी करण्यात येत आहे

येथील मोबाईलचे टावर बंद पडले असल्यामुळे या गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे कोणाचा ही संपर्क नाही
असुन गावकरी व इतर गावातील लोकाना संपर्क साधता येत व संकट काळात संपर्क करण्यासाठी पर्याय नसल्यामुळे सदरच्या टावर धारकांनी तात्काळ लक्ष देऊन टॉवरची दुरुस्त करावी अशी मागणी संताप जनक करण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments