Header Ads Widget

माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात श्री गणेश विसर्जनाच्या वेळी कोणत्याही गणेश मंडळांनी डीजेचा वापर करू नये केल्यास थेट कार्यवाही - सपोनि विशाल पाटील भोसले यांचा थेट इशारा

      माधव पवार 
माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात श्री गणेश विसर्जनाच्या वेळी कोणत्याही गणेश मंडळांनी डीजेचा वापर करू नये केल्यास थेट कार्यवाही करण्यात येईल असा इशारा सपोनि विशाल पाटील भोसले यांनी गणेश मंडळा दिला आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ४५ गावात मोठया प्रमाणात श्री गणरायाच्या मंगल मूर्तिची स्थापना करण्यात आली असल्यामुळे दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी श्री गणरायाचे शांततेत विसर्जन करण्याची गरज आहे 

त्याच बरोबर या वर्षी गणपती विसर्जनामध्ये माननिय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कोणीही डीजेचा वापर करनार नाही यांची जबाबदारी गणेश मंडळाचे अधिकारी व पद अधिकारी यांनी घेण्याची गरज आहे

कुंटूर पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांनी सर्व गणेश मंडळांना सूचना देण्यात येत असून या वर्षी कोणी ही डीजे वाजवणार नाही जर डीजे वाजवले तर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा कुंटूर पोलीसानी दिला आहे 

Post a Comment

0 Comments