Header Ads Widget

शासनाच्या कल्याणकारी योजनेचा थेट जनतेला फायदा होणार आमदार बाबुराव कदम कोहळीकर

नागोराव शिदे पळसपुरकर 
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर 
मो नंबर 9561871019 
हिमायतनगर.  महसूल दिनानिमित्त हिमायतनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज दि ५ ऑगस्ट रोजी शहरातील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. आमदार बाबुराव कदम यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना सांगितले आहे की 
हिमायतनगर शहरात छत्रपती छत्रपती शिवाजी  महाराजस्व समाधान शिबिर संपन्न जरि झाले तरी पुढे छत्रपती शिवाजी महाराजस्व  अभियान अंतर्गत 
 शासनाच्या विविध कल्याणकारी योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे हे शिबिर महत्त्वाचे असून सर्वसामान्य जनतेने या योजनांचा लाभ घ्यावा ह्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल दिनाचे औचित्य साधून या आठवड्यात महसूल सप्ताह निमित्त सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर सर्वत्र राबवून ह्याचा थेट जनतेला लाभ झाला पाहिजे म्हणून हे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत ह्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमास हिमायतनगर तहसीलच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांनी शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेत, पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभघ्यावा असे आवाहन केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हदगाव उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ, शिवसेना तालुकाप्रमुख  रामभाऊ ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ पाटील, भाजप तालुका अध्यक्ष गजानन चायंल, तसेच विकास पाटील देवसरकर, विजय वळसे पाटील, शिवसेना  उपजिल्हाप्रमुख  राजू  पाटील भोयर ,सदाशिव सातव, विलास वानखेडे, प्रकाश हांपोलकर, संतोष पाटील कदम डोलारिकर,राम नरवाडे, शामराव येरेकर यांच्या सह हिमायतनगर तहसील कार्यालयाचे हिमायतनगर चे आदर्श मंडळ अधिकारी बि एम चव्हाण, हिमायतनगर सज्याचे  तलाठी पुरी ,हिमायतनगर ग्रामीण डॉ मुनेश्वर , ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी 
छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर  अभियानात नागरिकासह  अधिकारी कर्मचारी तालुक्यातील ग्रामस्थ आणि विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिराच्या माध्यमातून शासन-जनता संवाद अधिक प्रभावीपणे घडवून आणला गेला, असे मत अनेकांनी व्यक्त केले..

Post a Comment

0 Comments