Header Ads Widget

निजामाबाद पंढरपुर रेल्वेला तोबा गर्दी नांदेड जिल्ह्यातील भाविकांसाठी निजामाबाद पंढरपूर या रेल्वे गाडीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे नागोराव शिंदे पळसपुरकर

नागोराव शिंदे पळसपुरकर तालुका प्रतिनिधी हिमायतनगर मों नंबर 956871019 

हिमायतनगर. येथुन जवळच असलेल्या आंध्र प्रदेश मधील निजामाबाद जॅक्शन ते धर्माबाद उमरी नांदेड पूर्णा  परभणी परळी मार्गे जात असलेल्या पंढरपूर या रेल्वे गाडी मध्ये अक्षरशः पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी तर जागा सोडाच परंतु खाली बसलेल्या भाविकांना सुद्धा संडास बाथरूमला जाण्यासाठी रस्ता नव्हता एवढी मोठी आज दिनांक ४ रोजी तुफान गर्दी  दिनांक ५ रोजी एकादशि असल्याने पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असताना भक्तांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असतांना गाडीमध्ये काही लोक दादागिरी करून वयस्कर वृद्ध भाविक भक्तांना त्रास देताना सुद्धा दिसत  होती या बाबीकडे नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांची दूर व्यवस्था होणार नाही याची दक्षता घेणे काळाची गरज असल्याचे भाविकांतुन बोलल्या जाता आहे याचबरोबर  रेल्वे मंत्रालयाने या मार्गावरून गाड्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे वय वृद्ध भाविकातून बोलल्या जात आहे हे वृत्त प्रकाशित करण्यासाठी भाविकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी सुद्धा या गाडीमध्ये जाण्याची व्यवस्था नव्हती कारण रेल्वे गाडीच्या दरवाजापासून ते सीटवर बसेपर्यंत तोबा गर्दी दिसून येत होती पंढरपूर जाण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील भाविकांच्या सुव्यवस्थेवर लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याचे आज प्रथम दर्शनी दिसून आले असल्याने नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे  डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना हिमायतनगर तालुका अध्यक्ष नागोराव शिंदे पळसपुरकर यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments