तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
मो नंबर 9561871019
हिमायतनगर: उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार सौ पल्लवीताई टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली, हिमायतनगर तहसील चे नायब तहसीलदार एच. जी. पठाण यांच्या टीमच्या पुढाकारातून महसूल व वैद्यकीय डॉ गोविंद वानखेडे पभणकर यांच्या पथकाने शिरपल्ली आणि डोलारी या गांवचा पूर्णतः संपर्क तुटलेल्या गावात बोटीच्या सहाय्याने यशस्वीपणे पोहोचून मदतकार्य सुरू केले आहे.
हिमायतनगर चे नायब तहसीलदार एच. जी. पठाण हे आपल्या सोबत मंडळ अधिकारी बी एम चव्हाण, तलाठी सब्बनवार, डॉक्टर प्रताप परभनकर, डॉक्टर गोविंद वानखेडे, आशा वर्कर कांताबाई तपासकर, पोलीस पाटील कोतवाल योगेश आलेवाड, कर्मचारी हरीश गिरी, वाहनचालक आकाश बारकुल व बोट चालक रवी अंभोरे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
१५ ऑगस्ट २०२५ पासून मुसळधार पावसामुळे या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. काल संध्याकाळी प्रतिकूल हवामानामुळे पथकाला गावात प्रवेश करता आला नाही. अखेर आज सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून बोटीच्या सहाय्याने पथकाने गावात प्रवेश केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी हिमायतनगर पळसपुर डोलारी सिरपली रस्त्यावर जे सिद्दिकी नावाच्या गुत्तेदार आणि अभियंता यांच्या दुर्लक्ष पणाचा जणु काय पाडा वाचलाय चार वर्षांपासून रस्त्यावरिल पुलाचे काम केले नसल्याने आम्हाला पैनगंगेच्या पुराचे पाणी रस्त्यावर आले असल्याने आम्हाला दिनांक 16 ते 21 ऑगस्ट पर्यंत तालुक्याचा संपर्क साधता आला नाही असे संतोष पाटील कदम डोलारिकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे
सिरपलि. डोलारि या गावात पोहोचताच वैद्यकीय पथकाने तात्काळ आरोग्य सेवा सुरू केली. नागरिकांची तपासणी करण्यात आली असून गंभीर रुग्ण आढळून आले नाहीत. तसेच गावातील जुन्या व नुकसानग्रस्त वस्तूंची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या प्रयत्नांचे अणिल पाटील सिरपलिकर यांनी मनःपूर्वक स्वागत केले आहे.

0 Comments