Header Ads Widget

पारंपरिक बैल पोळा शांततेत गावकऱ्यांनी साजरा करावेत सपोनि विशाल पाटील भोसले यांचे कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समस्त गावकऱ्यांना आवाहन !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्याच्या कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांना पोलीस ठाणे येथे बोलावून त्याच बरोबर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याच्या संदर्भात विशेष चर्चा करण्यात आली आहे

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हदीतील सर्व जयंती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी बोलावून शांतता कमिटीची बैठक घेतली आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण ४५  गावे असल्यामुळे त्या त्या गावातील पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने व पारंपारिक बैल पोळा शांततेत साजरा करण्यासाठी सदरची शांतता कमिटीची बैठक कुंटूर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती 

कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांनी काही दिवसात श्री गणरायांच्या मंगलमूर्तीची स्थापना होणार असल्यामुळे धार्मिक व सार्वजनिक सणाच्या संदर्भात गावातील नागरिकांनी व जनतेने व प्रतिष्ठित नागरिकांनी एकमेकांना सहकार्याची भावना ठेवून सर्व सण शांततेत साजरे करावेत असे सपोनि विशाल पाटील भोसले यांनी केले आहे 

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात त्यांच्या सचोटी इतकाच त्यांच्या बैलांच्या कष्टाचा मोलाचा वाटा असतो त्यामुळे बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात बैल पोळा सण उत्साहात साजरा केला जातो असे कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांनी म्हटले आहे 

सदरचा पा रंपरिक पोळा हा सण श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो असे कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

सदरचा पारंपारिक बैल पोळा शांततेत गावकऱ्यांनी साजरा करावेत सपोनि विशाल पाटील भोसले यांचे  कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समस्त गावकऱ्यांना आवाहन केले आहे 

Post a Comment

0 Comments