Header Ads Widget

हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथे समस्त गावकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने केला पोळा साजरा मंगलाष्टक म्हणून लावले बैलांचे लग्न !!

नागोराव शिंदे - मो. ९५६१८७१०१९ - 
नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथे समस्त गावकऱ्यांनी एकीचा संदेश देत हिंदू संस्कृती प्रमाणे व पारंपरिक पद्धतीने बैल पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे 
जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथे पोळ्याचा सण हा समस्त गावकऱ्यांनी अति आनंदात साजरा करून आम्ही सर्व गावकरी एक आहोत असे पोळ्याच्या सणाच्या माध्यमातून जनतेला दाखवून दिले आहे 
हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर गाव हे छोटे आणि मोठे असले तरी या गावची परंपरा वेगळ्या पद्धतीची असून समस्त गावकऱ्यांच्या वतीने सदरचा सण हा उत्साहात साजरा करीत सर्व बैलाचे एका जागी म्हणजे देवाच्या समोर बैलांचे मोठ्या थाटात लग्न लावले आहे 
हिमायतनगर तालुकाच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातील सर्व गावकऱ्यांनी अशाच पद्धतीने एकत्रित पणे सण साजरा केला तर हा संदेश सर्वत्र चांगल्या प्रकारे गेल्या शिवाय राहत नाही एकी ही गावची अतिशय महत्त्वाची असल्यामुळे ह्या पळसपूर या गावात गावकऱ्यांनी सर्वच बैल एका जागी करून त्यांचे लग्न लावून दिले आहे 

तालुक्यातील पळसपुर येथील गावकऱ्यांचा आदर्श घेण्या सारखे असल्यामुळे भविष्यात सर्व खेड्यापाड्यातील गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्रपणे पोळा साजरा करून गावची एकी दर्शविने गरजेचे आहे

Post a Comment

0 Comments