नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक २७ ते २८ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे
जिल्हातील सदरच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे काही दिवसात पंचनामे करण्यात येतील असे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
नायगाव तालुक्यातील बरबडा, कुंटूर, नरसी, नायगाव, मांजरम या मंडळात अतिवृष्ठीची नोंद झाली परंतु घुंगराळा मंडळाचे नाव आले नसल्यामुळे ते सुद्धा मंडळाची नांदेड जिल्हाचे जिल्हाधिकारी राहुलजी कर्डीले यांनी लक्ष देऊन नोंद घ्यावी असे सदरच्या शेतकऱ्यातुन विनंती करण्यात येत आहे
जिल्ह्यातील नायगाव तालुक्यासह अन्य तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे सध्याच्या परिस्थिती मध्ये तहसीलदार व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या मार्फत पिकाची प्राथमिक पाहणी करण्यात येत आहे
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून शेतकरी ग्रस्त शेतकऱ्याना तात्काळ अनुदान मिळवून देण्यातसाठी वरिष्ठ पातळीवर प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ही सांगितले आहे

0 Comments