जिल्हासह नायगाव तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेत जमिनीच्या नुकसानी बाबत आढावा घेण्यासाठी नांदेडचे पालकमंत्री ना. अतुल सावे यांचा नायगाव तालुक्यात दौरा आयोजित करण्यात आला होता.
यात प्रामुख्याने अधिकृतरित्या बरबडा, आणि सर्व मंडळात नायगाव व शेवटी कुंचेली असा त्यांचा निश्चित दौरा होता
परंतु याच रस्त्यावर असलेल्या कहाळा (बु.),पाटोदा येथील गावातील अनेक शेकडो एकर जमिनी ह्या या अतिवृष्टीमुळे खरडून गेल्या आहेत
कहाळया मध्ये तर अनेकांच्या घरात, प्रार्थना स्थळांमध्ये,जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरलं.अतिशय नुकसान या भागात झालेलं आहे
अचानक आलेला पाण्याचा लोट घरात शिरला की जपलेली स्वप्नं क्षणात वाहून जातात ओल्या भिंती,चिखलाने माखलेलं घर आणि हातातून निसटलेला संसार हेच शेवटी वास्तव उरतं.हे वास्तव जर पालकमंत्री यांनी पुलावरून न बघता थेट घटनास्थळी जाऊन बघितले नाही असे सांगण्यात येते आहे
प्रत्यक्षात त्यांना ही या गोष्टी समजल्या असत्या त्यांनी तस केले नाही पण आता ते म्हणतील निश्चित दौऱ्यात हे गाव नाही तर मग पालकमंत्री चा दौरा कुठे होता हे ही समजून घेणे महत्त्वाचे आहे
पुढे पाटोद्यात देखील शेकडो हेक्टर जमिनी दरवर्षी बाधित होतात.मागील तीन-चार वर्ष सलग ड्रोन द्वारे हे फुटेज सुद्धा उपलब्ध आहेत
निसर्गाच्या अशा लहरी पणामुळे या भागातील शेतकऱ्यांचा दरवर्षी हिरावला जातो. एवढ्या समस्या असताना देखील त्यांच्या निश्चित दोऱ्यामध्ये ही गावे का वगळली असावी..?? हा प्रश्नच आहे.
बरबड्यामध्ये देखील त्यांनी अत्यंत घाई केली.मी तर म्हणतो हा दौरा केवळ औपचारिकतेपुरताच झाला आहे
गावकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याची, त्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकण्याची अपेक्षा असतानाही पालकमंत्र्यांनी घाईघाईने दौरा आटोपला आहे
नांदेडच्या पालकमंत्र्यांचा दौरा म्हणजे रोड शो ना शेतकऱ्याची काळजी ना जनतेची काळजी सदरचे पालकमंत्री पूर ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते की रोड शो करण्यासाठी आले होते असा प्रश्न जनसामान्य माणसातून चर्चेला जात आहे

0 Comments