Header Ads Widget

पंतप्रधान आवास योजनेचा पहिलाच हप्ता पडत नसल्यामुळे नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याकडे लक्ष देतील का ?

       माधव पवार
नायगाव तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेचे घरकुले अनेक लाभार्थ्यांना आले असले तरी सदरील घरकुलाचा पहिलाच हप्ता पडत नसल्यामुळे लाभधारक चांगलेच वैतागले आहे 

नायगावच्या पंचायत समिती कार्यालया मध्ये कोणत्याच अधिकाऱ्याचा व कर्मचाऱ्याचा एकमेकाला ताळमेळ लागत नसल्याने लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात खेळ सांड होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थ्यांना घरकुले शासना मार्फत मोठ्या थाटाने देण्यात आले काही लाभार्थ्यांना हप्ते पडत असले तरी अनेक लाभार्थ्यांना पहिलाच हप्ता मिळत नसल्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष देतील का ? असा प्रश्न चर्चेला जात आहे  

 नायगाव येथे आधार अपडेट करण्यासाठी गेलेल्या लोकांचे गेल्या दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी अपडेट झाल्याच्या पावत्या देण्यात आल्या परंतु आत्ता पर्यंत सदरचे आधार अपडेट झाले नसल्याने सदरच्या लोकांत संताप व्यक्त केला जात आहे 

खेड्या पाड्यात काही घरकुल धारकाला आधार अपडेट झाले नसल्यामुळे पैसे पडत नसल्याचे नायगाव पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यातून सांगितले जाते या सुद्धा गंभीर बाबीकडे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेळीच लक्ष देऊन अपडेट कशामुळे होत नाही यांची सुद्धा विचारपूस करणे गरजेचे आहे 

आधार अपडेट करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कडून जवळपास दोनशे रुपये घेतले जाते परंतु सात महिने होऊन सुद्धा अपडेट होत नसल्याने कमालीची चर्चा होत असताना ऐकावयास मिळत आहे

Post a Comment

0 Comments