Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याला जन सामान्य माणसाचे प्रश्न जाणून घेणारा जबाबदार पोलीस अधिकारी मिळाला सपोनि विशाल पाटील यांच्या कार्यकाळात सर्वत्र शांतता !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याला एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याची म्हणजे सपोनि विशाल पाटील यांना ठाणे बहाल करण्यात आले असल्यामुळे सदरचा परिसर समाधान आहे

सदरील ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे पोलीस ठाण्यात येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रश्न गांभीर्याने सोडवित असल्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर ठाण्यांच्या अंतर्गत मधील लोक समाधान आहे

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस चौकीतील व नेमवून दिलेल्या बिट वरील पोलीस कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करीत असल्यामुळे खेड्या पाड्यावर सपोनि विशाल पाटील यांच्यासह पोलीस व बिट जमादाराचे जास्तीचे लक्ष असल्यामुळे सदर  ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सध्याच्या परिस्थितीमध्ये शांतता प्रस्थापित आहे 

कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ४५ गावावर कुंटूर पोलिसांचे लक्ष असल्यामुळे कुठे ही या कार्यक्षेत्रात अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व त्यांचे बिट जमादार व पोलीस कर्मचारी वेळीच लक्ष देत असल्यामुळे सदरच्या कार्यक्षेत्रात शांतता मय वातावरण असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments