Header Ads Widget

श्री शंभो ग्रुप नायगाव बाजार तर्फे भव्य १०८ कावड यात्रेचे आयोजन गंगाजल घेऊन गंगणबीड महादेव मंदिरात होणार महाभिषेक –

       माधव पवार 
श्रावण महिन्याचे पवित्र औचित्य साधत, श्री शंभो ग्रुप नायगाव बाजार यांच्या वतीने दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी (रविवार) एक भव्य १०८ कावड यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा श्री क्षेत्र गोदावरी गंगा बळेगाव येथून प्रारंभ होऊन श्री क्षेत्र महादेव मंदिर, गंगणबीड येथे संपन्न होणार आहे.
भाविक भक्तांच्या आस्थेचा व श्रद्धेचा अविष्कार असलेल्या या यात्रेमध्ये, श्री शंभो महादेवाच्या कृपेने व सद्गुरू मन्ना महाराज कोलंबीकर यांच्या आशीर्वादाने, दररोज गंगाजल आणून महादेवाचा महाअभिषेक केला जात आहे.

यात्रेची सुरुवात सकाळी पहाटे ५.३० वाजता गोदावरी गंगा बळेगाव येथून होणार असून, भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

१०८ कावड यांची संपूर्ण व्यवस्था शंभो ग्रुप नायगाव तर्फे करण्यात आली आहे.

भाविक भक्तांना हा अध्यात्मिक आणि भक्तिपूर्ण सोहळा अनुभवण्याची सुवर्णसंधी असून, यात्रेत सहभागी होऊन पुण्यप्राप्ती करावी, असे आवाहन श्री शंभो ग्रुपचे अध्यक्ष विश्वनाथ मेडेवार उपाध्यक्ष अविनाश चालीकवार माधव कल्याण संदीप पत्तेवार अतुल चालीकवार  सचिन शिंदे प्रतीक पाळेकर प्रदीप खंडगावकर अमोल गंदेवार श्री रुद्रवार ओमसाई मुंगीलवार बालाजी डोंगळीकर संतोष देसाई विलास पदमवार प्रशांत चंद्रावार ओमकार पांचाळ शंभो ग्रुपचे मार्गदर्शक जगदीश प्रतापवार ज्ञानेश्वर पापटवार सचिन कवटीकवार अतुल कवटीवार आशिष गोरठेकर  सुभाष पांचाळ व नायगाव बाजार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments