तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
मो नंबर 9561871019
हिमायतनगर. तालुक्यातील मौजे पळसपुर येथील जागृत देवस्थान नागनाथ मंदिराच्या कळसावर आज सकाळी सात ते आठच्या दरम्यान मुसळधार पावसाचे विजांच्या कडकडात सुरू असताना अचानक पळसपुर गावाच्या मध्यभागी असलेल्या नागनाथ मंदिराच्या कळसावर वीज पडून कळसाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्रत्यक्ष दर्शनी बोलल्या जात आहे हिमायतनगर तालुक्यामध्ये दिनांक 15 रोजी शुक्रवारी सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यातच दिनांक 16 शनिवार रोजी सकाळी पाच वाजल्यापासून पावसाचा जोर अधिकच वाढत गेला त्यामध्ये विजांचा कडकडाट फार मोठा होता त्याच क्षणांमध्ये मंदिराच्या कळसावर वीज पडल्याने आजूबाजूच्या घरांमध्ये जणू काय जाळ केल्यासारखाच विजेचा प्रकाश पडला असल्याचे निदर्शनास आले आहे

0 Comments