Header Ads Widget

नांदेड आकाशवाणी केंद्रात लोक संगीताचा कार्यक्रम कधी सुरू होणार ? जनसामान्य माणसासह कलाकारांची अपेक्षा !!

      माधव पवार 
नांदेड आकाशवाणी केंद्रात लोक संगीताचा कार्यक्रम कधी सुरू होणार? जनसामान्य माणसासह कलाकारांची अपेक्षा !!
नांदेड आकाशवाणीची (ऑल इंडिया रेडिओ, नांदेड ) स्थापना दिनांक २९ मे १९९१ रोजी झाली असून हे आकाशवाणीचे एफएम एफ एम स्टेशन आहे 

नांदेड आकाशवाणी केंद्राचे पहिले अधिकारी भीमराव शेळके होते. त्यांना कार्यक्रम अधिकारी म्हणून नेमणूक मिळाली होती त्यांच्या कार्य काळात लोक संगीताचे कार्यक्रम विविध कार्यक्रमाचे छान पैकी परसारण केले होते ग्रामीण भागात लोक संगीताचे कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ कानाला होता 

लोकप्रिय नांदेड आकाशवाणी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी लोक संगीताचा कार्यक्रम लवकरात लवकर चालू करून खेड्यापाड्यातील व शहरी भागासह बाहेर जिल्ह्यातील कलाकारांना आकाशवाणी नांदेड केंद्रात कला सादर करण्यासाठी वाव मिळवून द्यावी अशी मागणी कलाकारातून केली जात आहे 

आणि १०१.१ मेगाहर्ट्झवर एम एच झे) कार्यक्रम प्रसारित करते. नांदेड परभणी, हिंगोली, निजामाबाद, उमरखेड, उदगीर, परळी आणि अहमदपूर या शहरां मध्ये या केंद्राचे प्रसारण ऐकू येते.सहज रित्या ऐकू येते आहे

नांदेड आकाशवाणी केंद्र मधून लोक संगीताचे कार्यक्रम प्रसारित करण्यात येत होते त्यावेळी जनसामान्य माणसासह कलाकाराना मोठा आनंद होत होता परंतु गेल्या काही वर्षा पासून नांदेड आकाशवाणी केंद्र मधून सदरचा प्रसारित होणारा लोक संगीताचा कार्यक्रम बंद करण्यात आला आहे 

नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील कलाकारांना कला सादर करण्यासाठी वाव मिळत नाही त्यासाठी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जर लोक संगीताचे कार्यक्रमाचे प्रसारण चालू केल्यास छोट्या मोठ्या कलाकारांना आकाशवाणी नांदेड केंद्र मधून कला सादर करण्यासाठी त्यांना उत्तेजन मिळेल असे अपेक्षा कलाकारातून केली जात आहे 



Post a Comment

0 Comments