नायागांव तालुक्यातील रुई बु येथील ग्रामपंचायत कार्यालयात गावच्या महिला सरपंच सौ प्रियंका ताई निलेश देशमुख यांचे प्रतिनिधी निलेश भाऊसाहेब देशमुख यांच्या डोळस विचारातून दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सत्कार सोहळा संपन्न झाला आहे
महसूल सहाय्यक अधिकारी म्हणून आनंदा दत्ता दासरवाड निवड झाली असल्यामुळे त्यांच्या विशेष सत्कार करण्यात आला आहे
तालुक्यातील रुई बु येथील रहिवाशी असलेले जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग बिलोली येथे गेल्या अनेक वर्षा पासून शासकीय सेवेत उत्कृष्ट पणे कामगिरी करून सेवा निवृत्त झाले असल्यामुळे त्याच बरोबर अनुजा रामराव चिंचलवाड ह्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत झाल्या बद्दल सुद्धा त्यांच्या सत्कार करण्यात आलाआहे
ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटागंणात विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले यावेळी वरवटे एल बी शांतीनिकेतन विद्यालय मध्ये संगणक शिक्षक म्हणून रुजू झाल्याबद्दल सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला आहे
सेवा निवृत्त गँगमन नागोराव लक्ष्मण पवार यांचा ही सेवापूर्तीच्या सोहळ्यात सत्कार करण्यात आला आहे
रुई बु गावात एक महत्वाची परंपरा चालू असून कोणत्या जाती धर्मातील कर्मचारी सेवा निवृत्त झाला असेल किंवा एखादा मुलगा असो मुलगी शासकीय सेवेत नौकरीला लागली असल्यास ग्रामपंचायत कार्यालयाचा सत्कार केला जातो तसा सत्कार सोहळा सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख घडवून अनित असता हे मात्र सत्य असून सदरील कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन विजय शिंदे यांनी केले आहे

0 Comments