हिमायतनगर. येथे आज महाराष्ट्र कृषी दिन हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे यशस्वी आणि दूरदृष्टीचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज हिमायतनगर येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार सौ पल्लवीताई टेमकर यांच्या उपस्थितीमध्ये नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली आहे कृषीकांच्या हितासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या या थोर नेत्यांच्या कार्यास आजही मार्गदर्शक मानले जाते त्यांच्या योगदानामुळे महाराष्ट्रात शेती क्षेत्रात क्रांती घडली आणि हरितक्रांतीच्या यशाला हातभार लागला शेतकरी हा देशाचा कणा आहे हे तत्त्व त्यांनी प्रत्यक्षात उतरवले त्यांच्या या कार्याला आणि स्मृतीला शतशः नमन त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज हिमायतनगर येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार सौ पल्लवीताई टेमकर यांनी केले आहे यावेळी उपस्थित कर्मचारी प्रभारी नायब तहसीलदार एम झेड सिद्दिकी , सी एम राठोड , एन एस कदम , महसूल सहायक आर यु पवार , सी आर नागर्थवार गोपेवाड मॅडम महसूल सहाय्यक विशाल शेवाळकर ,महसूल सहायक एस आर कोंडलवार ,वाहन चालक आकाश बारकुल सेवक राजू , धोंगडे कोतवाल गिरी पुरवठा विभागातील ऑपरेटर मारुती गाडेकर , विकास गोरे , बालाजी शिराणे ,यांची यावेळी उपस्थिती होती

0 Comments