Header Ads Widget

पळसपुर हिमायतनगर परिसरातील बळीराजाचे डोळे लागले आभाळाकडे पावसाअभावी पिके कोमेजू लागली पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड


नागोराव शिदे पळसपुरकर 
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर 
मो नंबर 9561871019 
हिमायतनगर.     भर पावसाळ्यात पळसपुर सह हिमायतनगर परिसरात मागील १५ ते २० दिवसापासून आधुन मधुन पावसाच्या रिमझिम सरी तर रखरखते ऊन  पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उगवून आलेले खरिपातील कोवळी पिके हे कोमोजू लागली असून पिके वाचवायला मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. तरी हिमायतनगर तालुक्यातील व पळसपुर परिसरातील बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पळसपुर परिसरातील नदी नाले अवकाळी मान्सूनपूर्व पावसाने एकदा भरून गेले असल्यामुळे विहिरी तलावात पाणी आहे. परिणामी परिसरातील सर्वच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सध्यातरी समस्या मिटली असली तरी पिकांना पाण्याची नितांत गरज आहे, परंतु पेरणी होऊन जवळपास साठ दिवस झाले असून कोवळ्या पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. पाऊस नसल्याने कोवळी पिके कोमेजून जात असल्याने बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
सूर्याच्या पुनर्वसू नक्षत्राने आगमन झाले असून या नक्षत्रात अद्याप पावसाचा थेंबही पडला  नाही. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, उडीद, मूग ,कापूस,हाळद,आणि तूर ही पिके सुकण्याच्या मार्गावर असून यावर्षी पावसाअभावी खरीप पिकाचे उत्पन्न घटणार की काय ही चिंता बळीराजाला सतावत आहे. पळसपुर हिमायतनगर तालुक्यातील  सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झाला असून पाऊस वेळेत नाही पडल्यास पेरणी केलेल्या पिकांची वाढ होणे अवघड आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर ,डोलारी , सिरपलि,शेलोडा ,सिरजंनी,एकंबा,कोठा, घारापुर, टेंभुर्णी, दिघी, विरसणि, टेभि, आदेंगाव, पवना सरसम, करजि,दुधड, सोनारि आदि गावात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. वेळेवर पाऊस न आल्याने उगवलेली कोवळी पिके रखरखत्या उन्हात तग धरत नसल्याने शेतकऱ्यांना उन्हा तान्हात आपल्या बाल गोपाळांना हाताशी धरून कापसाच्या रोपट्‌याला हाताने पाणी घालून जगवण्याची वेळ आली आहे तर कोवळे असलेले सोयाबीन जास्त ऊन तपत असेल्याने सुकत आहे तालुक्यात सर्वत्र उन्हाचा कडाका वाढल्याने शेतकरी चिंतातूर
झाला आहे. काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या बोअर किंवा वहिरीत असलेल्या पाण्याने ठिबक सिंचन द्वारे कोवळ्या पिकांना थेंबाथेंबांनी पाणी देत जगवत आहे. शेतकऱ्यांनी जुन महिन्यात उसनवारी, व्याजाने पैसे काढून हजारो रुपयांच्या बियाण्याची पेरणी केली खरी परंतु पावसाने ऐन हंगामात पाठ फिरवल्याने खरीप हंगाम हातातून जातो की काय याची चिंता आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. विहिरीत पाणी नाही, विजेचा भरोसा नाही, आणि आकाशात ढगांची चाहूलही नाही. शेतकऱ्यांनी आता करावे तरी

..तर पिके करपतील

पुढील चार ते पाच दिवसात वरूण राज्याचा विलंब राहिला तर हिरवीगार दिसत असलेली पिके पुर्णपणे करपुन जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे चार ते पाच दिवसात वरूणराजाची कृपा झाली तर पिके हिरवीगार दिसतील. नाहीतर शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडतील.

- कल्याण वानखेडे 
शेतकरी मित्र पळसपुर

Post a Comment

0 Comments