हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यातील विरसणी येथील अवैध रेती साठा उघड करण्यासाठी आष्टी येथील पत्रकार गजानन जिद्देवार यांनी हिमायतनगर तहसीलदार सौ पल्लवीताई टेमकर यांच्याकडे तक्रार दिली होती त्या अनुषंगाने हिमायतनगर तहसीलदार. यांनी सदर रेती साठ्याचा लिलाव करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या .लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पत्रकार गजानन जिद्देवार हे विरसणी येथे पाहणी करता आले असता रेती तस्करांनी त्यांच्यावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला .याप्रकरणी गजानन जिद्देवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून विरसणी येथील शेख अफरोज व सोनू देवसरकर सह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन जिद्देवार यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मी सहा जून रोजी शुक्रवारी अकरा वाजण्याच्या सुमारास हिमायतनगर तहसील मध्ये रेतीसाठ्या ची माहिती घेऊन व माहिती अधिकार देऊन विरसणी मार्गे हदगाव कडे जात असताना विरसणी येथे गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात वाळू साठा होता तो तहसीलने जप्त करून त्याचा लिलाव आयोजित केला होता .या कारवाईची माहिती जाणून घेण्यासाठी व बातमी घेण्यासाठी गेलो असता तिथे हजर असलेल्या वाळू तस्कर शेख अफरोज यांनी जिद्देवार यांना येऊन तूच आमच्या वाळूची तहसीलदाराकडे तक्रार करणार आहेस का? म्हणत बेदम मारहाण केली तसेच सोनू देवसरकर व इतर अज्ञात आठ ते दहा जणांनी लाथा बुक्क्या मारुन बेदम मारहाण करून अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शेख अफरोज व सोनू देवसरकर यांनी अंगावर बसून गळ्यातील चाळीस हजार रुपयांची सोन्याची चैन काढून घेतली .झटापटी दरम्यान खिशातील पाच हजार रुपये कुठे पडले हे माहित नाही. तसेच चित्रीकरण केलेले माझे दोन्ही मोबाईल फोडले असल्याची तक्रार हिमायतनगर पोलीस स्टेशनला दिली त्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुरन 120 / 2025 कलम119/1,118(1)115(2)351(2)189(2)199(2)191(3)190'324,(4)324(5) अशाप्रकारे भारतीय न्याय समितीप्रमाणे गुन्हा दाखल झाला

0 Comments