तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरवला जातो तो, हा आठवडी बाजार नगरपंचायतने ठरवून दिलेल्या ठिकाणी न भरवता शहरातील मुख्य रस्त्याने भरवला जात आहे या सर्व बाबीकडे नगरपंचायत प्रशासन मात्र साफ दुर्लक्ष करत आहे हिमायतनगर शहराच्या मध्यभागी असलेल्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये अति गंभीर रुग्ण दररोज या ठिकाणी येतात या रुग्णांना नांदेड सारख्या ठिकाणी रेफर करुन घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या रुग्णवाहिकेस मात्र रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणातून वाट काढावी लागत आहे तरी पण मुख्य रस्त्यावरील भाजीपाल्याचे गाडे व मध्य भागी आंबे संत्रा आदी माळव्याचे गाडे रस्त्यावर उभे असल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक मात्र तासन तास ताटकळत असल्यामुळे शहरात येणाऱ्या रुग्णवाहिकेस रस्ता काही मिळेना त्यामुळे अति गंभीर रुग्णांना नांदेड सारख्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही या सर्व गंभीर बाबीकडे स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्यावरील अतिक्रमण मोकळे करून देण्याची मागणी शहरा सह तालुक्यातील ग्रामीण भागातील सुजाण नागरिकांतून होत आहे ...
हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तालुक्याला ५२ खेडे, विदर्भ व तेलंगणा आंध्र प्रदेश राज्याची सीमा लागून असल्यामुळे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे दर बुधवारी शहरातील मुख्य रस्ता ते ग्रामीण रुग्णालयकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र दिसून येत आहे शहरातील मुख्य भोकर किनवट रस्त्यावरील कमानी पासून ते ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण वाढल्यामुळे रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत आहे तर सध्या शेतकऱ्यांच्या शेती मध्ये लागणार्या बिबियानाचि खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे कृषी सेवा केंद्र आहेत त्या कृषी सेवा केंद्रातून खते व बी बियाणे घेऊन जाण्यासाठी रस्त्यावर मोठ मोठे ट्रक टेम्पो तासंन तास उभे राहत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या छोट्या वाहनांना ह्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे शहरात वाहतुकीला शिस्त लावण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे या बाबीकडे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी लक्ष देऊन या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्याची गरज असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे आज दिनांक २८ मे रोजी शहरातील मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे चक्क एक तास वाहतूक ठप्प झाली होत आहे त्या वाहतुकीमध्ये ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारी १०८ ची रुग्णवाहिका ही बराच वेळ वाहतुकीमध्ये अडकल्याने तिला तिथेच वाट काढावी लागत होती पण ही रुग्णवाहिका वाहतुकीमध्ये थांबल्यामुळे रुग्णालयात असलेल्या अतिदक्षता विभागातील रुग्णांच्या नातेवाईकांनी या अतिक्रमणाच्या विळख्यामुळे शहरातून ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका वेळेवर येत नसल्याचा आरोप केला आहे हीच परिस्थिती दर आठवडी बाजारला उद्भवत आहे त्यामुळे स्थानिक नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने दर आठवडी बाजारच्या दिवशी शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करून रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण कमी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे या सर्व गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शहरातील वाढलेले अतिक्रमण मोकळे करून देण्यासाठी मदत करावी अशी मागणी सुजाण नागरिकांकडून जोर धरू लागली आहे...

0 Comments