नायगाव तालुक्यातील खेड्या पाड्यातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिलाच हप्ता मिळाला नसल्यामुळे सदरचे लाभार्थी हतबल झाले असून संबंधित अधिकारी स्वतः आपल्याच तोऱ्यात वावरत असल्यामुळे त्यांचे लाभार्थाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष झाले आहे
तालुक्यातील खेड्या पाड्यातील बऱ्याच घरकुल धारकांना पहिलाच हप्ता मिळत नसल्यामुळे लाभार्थातुन संताप व्यक्त केला जात आहे
या संदर्भात नायागांवचे गटविकास अधिकारी एल आर वाजे या बेबीची कल्पना असली तरी पंचायत समिती नायागांव येथे अंतर्गत काम करणारे कर्मचारी कोणतेच लाभार्थाचे काम सुरळीत करत नसल्यामुळे नागरिकांना घरकुलाच्या पहिल्या हप्तासाठीच हैराण व्हावे लागत आहे
नायागांव पंचायत समितीचे कर्मचारी फोन उचलत नाहीत ग्रामपंचायतच्या ग्राम सेवकाला काहीच माहित नसते व घरकुलाचे इंजिअर उदंड भाषेत बोलत असतात तर कधी फोन उचलत नाहीत कधी उचलेले तर मला फोन करू नका असे लाभार्थाना सांगत आहेत
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या पहिल्या हप्त्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याला व कोणत्या इंजिनीयरला अथवा पंचायत समिती मधील कोणत्या कर्मचाऱ्याला भेटावे लागेल असा लाभार्थ्यापुढे गंभीर प्रश्न पडला आहे

0 Comments