तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर. विदर्भ आणि मराठवाडा जोडणाऱ्या डोलारी ते पेंनगंगा रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून बांधकाम विभाग हिमायतनगर व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षितपणामुळे रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असल्याने कमालीचा संताप व्यक्त केल्या जात आहे. खड्डे चुकविताना संतुलन बिघडल्याने कित्येक दुचाकीस्वार पडून जख्मी झाले आहेत.
पैनगंगा नदी ते डोल्हारी अडीच किलोमीटर रस्ता आपल्या दुर्दैवावर अश्रू ढाळत असून . कित्येक दिवसांपासून हा रस्ता दुर्लक्षित असून बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी ने या रस्त्याला तालुक्यातील हद्दीतूनच वगळले की काय?असे या रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक संताप व्यक्त करत आहे.

0 Comments