नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णुर येथे नूतन पोलीस ठाण्याची अमलबजावणी होऊन तब्बल १८ वर्षाखाली तत्कालिन पोलीस अधीक्षक लक्ष्मी नारायण यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याचे कृष्णूर येथील सुज्ञान नागरिकाचे म्हणे आहे
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सदरच्या नूतन पोलीस ठाण्याच्या संदर्भात जर लक्ष दिले तर सदरची इमारत काही दिवसात हुभारू शकते असे गावकऱ्यातून बोलल्या जात आहे
सदरची अंमलबजावणी होऊन सुद्धा इमारत सदरच्या पोलीस ठाण्याची निर्मिती व हुभारणी करण्यात आली नाही नसल्यामुळे ते कधी करणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाणे असले तरी कृष्णूर एम आयडी सीची निर्मिती झाल्यामुळे या ठिकाणी नूतन पोलीस ठाण्याची गरज भासत कारण कृष्णूरचे कार्यक्षेत्र कंपन्या मोठ मोठाल्या झाल्या आहेत
येथे काही अनुचित प्रकार घडू नये व येथील जवळ पासचे काही गावे कृष्णूर जोडण्यात आले होते यावेळी कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक वसंतराव मुगळीकर होते
तत्कालीन उद्योग मंत्री अशोकराव चव्हाण यांनी या भागातील लोकांना रोजगार मिळावा म्हणून कृष्णूर एम आयडीसीची निर्मिती केली आणि मोठं मोठाल्या कंपन्या ही हुभारण्यात आल्या आहेत
कृष्णूर येथील नूतन पोलीस ठाण्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी लक्ष देऊन मार्गी लावणार का ? असा प्रश्न गावकऱ्यातुन केला जात आहे

0 Comments