Header Ads Widget

नायगाव तालुक्यात अनेक ग्रामपंचायत वर महिलां राज असताना सुद्धा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलाचा सन्मान का ? केला नाही !!

       माधव पवार 
८ मार्च हा जागतिक स्तरावर दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो ज्यामध्ये महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा केला जात आहे 

महिलांच्या मुक्तीसाठी कार्य करणे व शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण करून त्यांना दर्जेदार जीवनाकडे नेणारे आहे

हा एक दिवस आहे जेव्हा महिलांचा आदर केला जातो आणि त्यांच्या अधिकारांना प्रोत्साहन दिले जाते. हा दिवस महिलांच्या समस्या, त्यांचे कर्तृत्व, त्यांचा संघर्ष आणि त्यांचे हक्क अधोरेखित करण्याचा एक खास प्रसंग आहे

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या समस्या समजावून सांगण्यासाठी, त्यांचे प्रबोधन करण्यासाठी आणि समाजातील त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात

या दिवशी लोक भाषणे देतात, महिलांसाठी चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करतात, त्यांचा सन्मान करतात आणि त्यांना विविध सन्मान आणि पुरस्कार ही देतात



Post a Comment

0 Comments