Header Ads Widget

हिमायतनगर तालुक्यातील सात गावात ॲग्रीस्टॅक विशेष योजनेच्या कॅम्पमध्ये शेतकऱ्यांनी नोंदवला माठा सहभाग बि एम चव्हाण यांचि माहिती

नागोराव शिदे पळसपुरकर 
हिमायतनगर. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शासनाच्या ऍग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत हिमायतनगर सह तालुक्यातील सीरंजनी,अंदेगाव , सरसम,बोरगडी,सोनारी,दूधड या ठिकाणी आज हिमायतनगर च्या तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. तुमच्या गावात फार्मर आयडी कॅम्प येतोय तुम्ही तयार आहात का फार्मर आयडी कॅम्प मध्ये सहभागी होण्यासाठी काय कराल या माहितीसाठी आज हिमायतनगर येथे आणि तालुक्यातील सिरजनि सह येथे कॅम्प घेण्यात आला या कॅम्प मध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते अशी माहिती हिमायतनगरचे मंडळ अधिकारी बी एम चव्हाण यांनी दिली आहे यावेळी हिमायतनगर सज्याचे तलाठी पुरी उपस्थित होते 
या कॅम्पमध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी करण्यासाठी लागणारे कागदपत्र  तुमच्या जमिनीचा सातबारा किंवा ८  अ कागदपत्र सोबत ठेवा तुमच्या जमिनीचा अधिकृत पुरावा असणे आवश्यक आहे तसेच आधार कार्ड जोडणी ला असलेला मोबाईल नंबर घ्या जर मोबाईल नंबर जोडलेला नसेल तर जवळच्या सेवा केंद्रात जोडणी करून घ्या जर दोन ठिकाणी जमीन असेल तर या आयडीवर येईल आपल्या गावामध्ये आजपर्यंत कॅम्पची तारीख ठरली नसेल तर कॅम्प ची तारीख व ठिकाण जाणून घ्या तुमच्या गावातील महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यकाशी  संपर्क साधा जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटला भेट द्या आणि त्याच दिवशी हजर राहा तुमच्या गावातील कॅम्प साठी वेळेत पोहोचा जर दोन गावांमध्ये जमीन असेल तर दोन्ही ठिकाणी हाजर राहाणे आवश्यक आहे फार्मर आयडी चे फायदे असे आहे की सरकार सर्व सरकारी कृषी योजनांचा सुलभतेने लाभ घ्या हवामान अंदाज आणि अचूक मार्गदर्शन मिळवा ऋषी अनुदान आणि कृषी उत्पन्न खरेदीसाठी सुलभता पीक उत्पादनासाठी विशेष सल्ला मिळवा तुमच्या शेतीचे भविष्य आजच सुरक्षित करा असे यावेळी या त्यामध्ये आज हिमायतनगर तालुक्यातील कॅम्पच्या ठिकाणी  सांगण्यात आले आहे यावेळी उपस्थित शेतकरी अनंता देवकते  संतोष रासमवाड थोटे गंगाधर मिरासे आधी शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments