Header Ads Widget

करंजी येथील महिला शेतकऱ्याचा शॉर्टसर्किटमुळे पंचेचाळीस पाईप तुषार संच जळून जाग्यावरच झाला खाक ....

नागोराव शिंदे पळसपुरकर 
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर  

हिमायतनगर  तालुक्यातील
करंजी येथील अल्पभूधारक महिला  शेतकरी प्रमिला प्रभाकर चव्हाण सर्वे नंबर १०९मधील ऊस गेल्यानंतर पाचट कुट्टी केलेल्या ऊसाला पाणी देण्यासाठी ठेवलेल्या   पंचेचाळीस तुषार पाईप चा संच शॉर्टसर्किट झाल्यामुळे जळून जागेवरच खाक झाला आहे. ही घटना दिनांक ३०  मार्च रोजी दुपारी तीन च्या सुमारास घडली असल्याचे येथील शेतकरी रंगराव जाधव  यांनी  आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे अगोदरच कारखान्यांनी ऊस नेण्यास विलंब केला असल्यामुळे शेतकऱ्यांना बराच नुकसानीचा सामना करावा लागत आहे तसेच हिमायतनगर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक विजेच्या तारा ह्या जीर्ण झाल्या असल्याने महावितरण कंपनीच्या वरिष्ठांकडे वारंवार लेखी तक्रारी करून सुद्धा लोमकळलेल्या तारा कंडक्टर आणि जीर्ण झालेल्या तारा बदलण्यास कुठलेही ठोस पाऊल उचलले नसल्याने शॉर्टसर्किटचे वाढते प्रमाण लक्षात घेता महावितरणने तात्काळ तालुक्यातील जीर्ण झालेल्या तारा कंडक्टर बदलून द्यावी अशी मागणी शेतकरी शेतकऱ्यासह विद्युत ग्राहकाकडून केल्या जात असल्याने या गोष्टीकडे  महावितरणचे संबंधित अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागून शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या दुर्घटनेत करंजी येथील  महिला शेतकरी प्रमिला प्रभाकर चव्हाण यांच्या शेतातील पंचेचाळीस तुषार पाईप संच  आगीच्या कचाट्यात येऊन जागीच खाक झाले आहे या अल्पभूधारक शेतकऱ्याचे अंदाजे ६० ते ७० हजार नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी महावितरण विभागांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सूर्या ग्रुपचे जिल्हाध्यक्ष राज गाडेकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments