Header Ads Widget

रुई खुर्द येथे एक महिना सात दिवसात रोजगार हमी योजने अंतर्गत बांधण्यात आलेली विहीर कोसळली बिर्ला ए वन कंपनीचे कर्मचारी केली सिमेंटची चौकशी शेतकऱ्याचे साडे सहा लाखाचे नुकसान !!

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे रुई खुर्द येथे एका गरीब शेतकऱ्यांना शासनाकडून म्हणजे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत एकंदरीत पाच लाख रुपयाची विहीर नायागांवच्या पंचायत समिती कडून मंजुरी करण्यात आली आणि या विहिरीचे बांधकाम दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी चालू करण्यात आले आहे 
जिल्हाच्या नायगाव तालुक्यातील रुई खुर्द येथील गरीब शेतकरी कामाजी शामराव मुकदम यांनी सदरची आलेली शासनाचीं ही विहीर गट क्रमांक २४१ मध्ये खोदली या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले असताना सुद्धा त्याला एक ही हप्ता मिळाला नाही असे शेतकऱ्यानी सांगितले आहे नायगाव तालुक्यातील शेतकरी कामाजी शामराव मुकदम या शेतकऱ्याचीं विहीर बघण्यासाठी कोणी आले नाही आणि त्यांना शासनाचा एक तूटपुंजा रुपाडा मिळाला नाही तरी सदरच्या शेतकऱ्याने विहिरीचे बांधकाम करण्यासाठी घरातून साडे सहा लाख खर्च करून विहीर बांधली परंतु दिनांक २७  मार्च २०२५ रोजी भुईसपाट झाल्याचे व्रत आहे 
तालुक्यातील रुई खुर्द येथील शेतकरी कामाजी शामराव मुकादम यांनी नायागांवच्या एका नामांकित दुकानदारा कडून बिर्ला ए वन ग्रेट नावाची सिमेंट खरीदी केली होती सदरची वापरल्यामुळे सदरचीं विहीर भुईसपाट झाली असा शेतकऱ्यानी दावा केला आहे 

रुई खुर्द येथे एक महिना सात दिवसात रोजगार हमी योजने अंतर्गत बांधण्यात आलेली विहीर कोसळली बिर्ला ए वन कंपनीचे कर्मचारी केली सिमेंटची चौकशी शेतकऱ्याचे साडे सहा लाखाचे नुकसान झाले असल्यामुळे सदरच्या कंपनी कडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे 

Post a Comment

0 Comments