Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी विधान परिषदेवर जाणार असल्याचीं चर्चा !!

      माधव पवार 
राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी कोणता फेर बदल होईल कोण कोणत्या पक्षात प्रवेश करील यांचा जनतेला कोणता पता नसतो परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी विधान परिषदेवर जाणार असल्याचीं चर्चा मोठया प्रमाणात रंगायला लागली आहे 

राज्यात काही महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका लागणार असल्यामुळे पक्षाच्या मजबूती करणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा घुंगराळा येथील भूमिपुत्र वसंत पाटील सुगावे विधान परिषदेचीं संधी मिळणार असल्याचीं चर्चा रंगत आहे 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 
अजित दादा पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे यांना पक्षाने जर विधान परिषदेवर घेतले तर नक्कीच नायगाव विधानसभा मतदार संघाचा परिपूर्ण विकास झाल्या शिवाय रहात नाही असा विश्वास जन सामान्य माणसातून केला जात आहे 

Post a Comment

0 Comments