राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत
माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर त्यांच्या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नरसी येथे येत आहे
राज्याच्या राजकारणात कोण किती मंत्री संत्री पाहिले असतील परंतु जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातील आणि आमचे लाडके दोन नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांना जनसामान्य माणसांचे कैवारी नेते म्हणून ओळखले जात आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी येत असल्याने नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर जागो जागी स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यानी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व त्यांच्या सोबत येणाऱ्या विशेष मान्यवारांचे स्वागत करण्यासाठी मोठी जय्यत तयारी वसंत पाटील सुगावे यांनी केली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जंगी स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे

0 Comments