Header Ads Widget

पासदगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्साहात समारोप बालकाचे कौतुक !!


नांदेड/प्रतिनिधी..प्रल्हाद आयनेले सर -

नांदेड -मालेगाव रोडवरील पासदगाव येथे वै.प.पु. गुरुवर्य अशोक महाराज आळंदीकर यांच्या प्रेरणेने,ह.भ.प.दिगांबर महाराज किरकन आळंदीकर ह.भ.प. कोंडीबा महाराज पासदगावकर यांच्या मार्गदर्शनात  सतत सात दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप दिनांक २५ मार्च राजी हभप दिगांबर महाराज किरकण आळंदीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने उत्साहात संपन्न झाला आहे 
अखंड हरिनाम सप्ताहाच्या दैनंदिन कार्यक्रमासह भागवताचार्य हभप एकनाथ महाराज मस्के मालेगावकर यांच्या भागवत कथेला व  रात्री हरि कीर्तनास पासदगाव सह नांदेड शहरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे विशेष म्हणजे पासदगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहात गावातील ज्येष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह  पुढाकार घेऊन युवकांनी घडून आणला आहे असे धार्मिक कार्यक्रम गावागावात होणे अपेक्षित असल्याचे मत नांदेड उत्तर चे आ. बालाजीराव कल्याणकर यांनी अखंड हरिनाम सप्ताहात भेटीदरम्यान व्यक्त करून सर्व युवकांचे, गावकऱ्यांचे कौतुक केले आहे 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पासदगाव येथील युवक गोविंद जाधव, माधव जाधव,बापूराव जाधव, पांडुरंग माऊली, आनंदा किरकण, नरहरी जाधव, सुरज जाधव, मुंजाजी जाधव,सुखदेव जाधव, नवनाथ जाधव ,पवन प्रभाकर, किरण पा. जाधव,चंद्रकांत सुदाम, शिवानंद जाधव, ज्ञानेश्वर जाधव, राम जाधव गणेश जाधव, बाबुराव जाधव, तुकाराम जाधव, ज्ञानेश्वर जाधव,
गंगाधर जाधव, गवळी नरहरी, राजाराम जाधव,शंकर जाधव, माझी चेअरमन चांदोजी जाधव, माझी सरपंच बाबाराव जाधव यांच्यासह गावातील जाधव, भालेराव, किरकण, कदम, पवार, आगलावे कुटुंबीयातील महिला पुरुषांनी विशेष असे परिश्रम आहे 

सदरील  कार्यक्रम उत्साहात पार पाडला.मृदंग वादक गणेश महाराज पांचाळ, तर गुणिजन गायक माधव महाराज वचेकर, ज्ञानोबा माऊली नावकी, कवठेकर गुरुजी तसेच विनेकरी अशोक महाराज जाधव पासदगावकर‌ यांच्यासह अनेकांनी अखंड हरिनाम सप्ताहात सेवा दिली.



Post a Comment

0 Comments