Header Ads Widget

पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलाचा विशेष सन्मान - पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांचे कौतुकास्पद कार्य !!

      माधव पवार 
नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करण्यासाठी पोलीस ठाण्यात सदरील महिलांचा सन्मान पूर्वक सन्मान केला आहे 
ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा नायगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सुद्धा त्यांनी महिलांना पोलीस ठाण्या मध्ये बोलावून सन्मानाने बोलून सन्मान केला होता त्यांच्या कौतुकास्पद कार्याचे नायगाव तालुक्याच्या वतीने अभिनंदनही करण्यात आले होते 
दिनांक ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे आलेल्या सर्व तक्रारदार महिला यांना ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या वतीने भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत 
पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदार महिलांच्या अडी अडचणी जाणून घेण्यात आल्या असून महिल सुरक्षेच्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन यावेळी करण्यात आले आहे 

डाएल ११२ बाबत माहिती देण्यात आली असून 
तसेच पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे कार्यरत असलेल्या सर्व पोलीस महिला अंमलदार यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भेट वस्तू देण्यात आल्या आहेत 

व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या असल्यामुळे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांचे कौतुक करण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments