Header Ads Widget

ग्रामीण पोलिसांचा एस. पी. साहेबांकडून सत्कार.ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये उत्कृष्टपणे काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा एस. पी. साहेब यांच्या तर्फे सत्कार

      माधव पवार 
दि. 7/3/25 रोजी पोलीस अधीक्षक अबिश कुमार साहेब यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी घेतली असून. यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनची पाहणी करून ग्रामीण पोलिसांच्या कार्याचे मूल्यमापन केले.
 मागील काही महिन्यांमध्ये ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्याच्या विरोधात मोठी कारवाई केली यामध्ये दारू जुगार अैवेद्य रेती गांजा अवैध जनावर वाहतूक अवैधपणे शस्त्र बाळगणे यांचा समावेश आहे. 
तसेच खून,खुणाचा प्रयत्न अशा गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना जेल मध्ये पाठवले.
14 सराईत आरोपीवर MPDA अंतर्गत कारवाई केली आहे.
 चोरी,जबरी चोरी,चेन स्नॅचिंग,मोबाईल स्नॅचिंग अशा गुन्ह्यांना आळा घातला आहे.
महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विविध शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेऊन महिला विषयक कायद्याबाबत जनजागृती केली.
 ग्रामीण पोलिसांच्या उत्कृष्ट कारवाही संबंधने एस. पी. साहेब यांनी पोलीस निरीक्षक चिंचोलकर, पोलीस अमलदार  सत्तार शेख,विक्रम वाकडे, शंकर माळगे, मारोती पचलिंगे, ज्ञानेश्वर कलंदर,विष्णू कल्याणकर, संतोष पवार,माधव माने, महिला पोलीस अमलदार वैशाली घोनशेटवार, यांचा सत्कार करून यांना चांगल्या कामा संबंधाने प्रशस्तीपत्र देऊन शुभेच्या दिल्या. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कामाबद्दल  एस. पी. साहेब यांनी समाधान वेक्त केले असून चांगले काम करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments