ग्रामीण हद्दीमधील दिग्विजय नाडागुडे, गणेश मोरे, डोरेमोन उर्फ संघरत्न वाघमारे या आरोपींवर दहा ते पंधरा गुन्हे दाखल आहेत. यापैकी काही वर एम पी डी ए अंतर्गत प्रतिबंधक कारवाई झालेली आहे एमपीडीए अंतर्गत ते एक ते दीड वर्ष जेलमध्ये होतेतरी त्यांच्यात सुधारणा झाली नाही. हडको सिडको भागामध्ये यांनी अनेक गंभीर गुन्हे केलेले आहेत. जन माणसांमध्ये यांच्या बद्दल मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण होतेनेहमी टू व्हीलर ने फिरणे हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन टू व्हीलर ने फिरणे अचानक कोणावर जीवघेणा हल्ला करणे अशा प्रकारचे कृती यांनी केलेले आहेत. यांच्यातीलच एक आरोपी भैया मिरासे यांनी पोलिसांवर गोळीबार केला होता त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर देऊन गोळीबार करून त्याला जखमी केलेले आहे
या आरोपी बद्दलची समाजातील व्यापाऱ्यांमधील दहशत कमी व्हावी लोकांच्या मनात सुरक्षिततेचे वातावरण रहावे कायद्याबद्दल विश्वास जागृत व्हावा अशी कृती आज रोजी नांदेड ग्रामीण पोलिसांनी करून आरोपींची धिंड काढली आहे
ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर, सपोनि मंटे पीएसआय चव्हाण मटवाड व ग्रामीण पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी सदर आरोपी च्या गुन्हे याचा छडा लावून आवश्यक ती प्रतिबंधक कारवाई केली आहे
व सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांन कडून अभिनंदन केले जात आहे.

0 Comments