Header Ads Widget

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रवीण खंदारे तर नांदेड महानगर अध्यक्षपदि नकुल जैन यांची निवड.

नागोराव शिदे पळसपुरकर 
हिमायतनगर नांदेड डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या उपस्थितीत नुकतीच शासकीय विश्रामगृह नांदेड येथे घेण्यात आली 

नांदेड जिल्हा अध्यक्षपदी प्रवीण खंदारे तर नांदेड महानगर अध्यक्षपदी नकुल जैन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.आहे 
या निवडीचे पत्र राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आले आहे 

नांदेड जिल्हा कार्यकारिणी अशी जिल्हाध्यक्ष इंजि.प्रवीण खंदारे, उपाध्यक्ष जावेद शेख, शिवाजी हंबर्डे जिल्हा सचिव प्रवीण देशमुख, कार्याध्यक्ष कुलदीप नंदूरकर, कोषाध्यक्ष महेंद्र देमगुंडे, सहसचिव कुवरचंद मंडले, शेख मौला तर सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली. 

यावेळी नांदेड महानगर कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली ,यात अध्यक्षपदी 

नकुल जैन, उपाध्यक्षपदी अमोल शेळके, तर सचिवपदी अविनाश प्रघाणे यांची निवड करण्यात आली..
सदरील बैठकीस राज्य पदाधिकारी सतीश सावंत, तेजस राऊत, विकास भोसले, इकबाल शेख हे उपस्थित होते..

नांदेड जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नव्या कार्यकरिणीचे  हिमायतनगर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांकडून सर्व तसेच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे..

Post a Comment

0 Comments