Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील २४०० शेतकऱ्यांना अंगठे व केवायसी झाली नसल्यामुळे पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेचे हप्ते मिळेनात - शासकीय सर्व्हे मध्ये म्हणे चार लोकांना हप्ते मिळेनात ?

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील २४०० शेतकऱ्यांना अंगठे व केवायसी झाली नसल्यामुळे पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेचे हप्ते मिळेनात - शासकीय सर्व्हे मध्ये म्हणे चार लोकांना हप्ते मिळेनात अशी गत निर्माण झाली असताना सुद्धा सदरचे प्रशासन लक्ष देत नाही हे दुर्दैवी बाब आहे 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळत होता परंतु गेल्या एक ते वर्षा पासून या सदरच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे सदरचे शेतकरी चांगलेच वैतागले आहे 

या राज्यातले मंत्री संत्री आमदार खासदार या शेतकऱ्याच्या गंभीर बाबीवर आवाज का ? उठवत नाहीत व केवायसी रद्द करून शेतकऱ्यांना त्या सदरच्या पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेचा लाभ मिळावा म्हणून का प्रयत्न करीत नाहीत असा संतप जनक सवाल शेतकऱ्यासह जनतेतून केला जात आहे 

जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील जवळ पास २४०० शेतकऱ्यांना या योजनेची केवायसी झाली नसल्यामुळे व अंगठा येत नसल्यामुळे व त्याचं बरोबर लँड प्रॉब्लेम असल्यामुळे ह्या शेतकऱ्यांना पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेचे अर्थात सन्मान निधीचे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

या राज्यातले दळभद्री सरकार शेतकऱ्यांच्या हिताकडे बघत नसून तो स्वतःच्या फायद्याकडे जास्तीचे लक्ष देतो आणि नको त्या योजना देत पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेच्या सन्मान निधी पासून वंचित ठेवले आहे 

सरकारच्या बेरजबाबदारपणामुळे नायगाव तालुक्यातील जवळ पास २४०० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही परंतु शासकीय सर्वेनुसार अधिकारी म्हणतात केवळ नायगाव तालुक्यात तीन ते चार शेतकऱ्यांनाच पैसे मिळत नाहीत बाकी सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो हे सदरच्या कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे

नायगावच्या कृषी विभागा कडून माहिती घेतल्या नुसार येथील सदरचे कृषी अधिकारी म्हणतात ह्या नायगाव तालुक्या मध्ये सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेचा लाभ मिळतो केवळ चार शेतकऱ्यांना केवायसी होत नसल्यामुळे व डोळ्याची ही केवायसी होत नसल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही त्यासाठी ते चार नावे आम्ही शेतकऱ्याचे शासनाकडे पाठविले असल्याचे सांगितले आहे 

पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेचा म्हणजे सन्मान निधीचा हप्ता या नायगाव तालुक्यातील प्रत्येक खेड्यातील जवळ पास ५० ते ६० शेतकरी एका एका गावा मध्ये निघतात त्यांना सदरच्या योजनाचा लाभ मिळत नाहीं तर मग २००० हजार ३९६  शेतकऱ्यांच्या सन्मान निधीचे हप्ते गेले कुठे असा प्रश्न चर्चेला जात आहे


Post a Comment

0 Comments