Header Ads Widget

बघा : आपले सरकारचा अजेब कारभार केवायसीची साईट बंद असल्यामुळे दिसतो १००१ चा आकडा तात्काळ चालू करा ऑनलाईन तक्रारी करण्यासाठी होतोय विलंब !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यात प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आपले सरकारची केवायसी साईट बंद असल्यामुळे ऑनलाईन तक्रारी करण्यासाठी शेतकरी सेतू केंद्रावर जात तक्रारी नोंदवण्याचा प्रयत्न करीत असताना सुद्धा शासनाच्या अजेब कारभारामुळे शेतकरी चांगला बुचकळ्यात पडला आहे 

केवायसी सेवेद्वारे जन्मतारीख, लिंग याचबरोबर पत्त्याचा पुरावा, ओळखीचा इलेक्ट्रॉनिक पुरावा असे तपशील तात्काळ प्राप्त होतात. त्याचबरोबर सेवा प्रदात्याला अर्जदाराचा मोबाइल नंबर आणि ईमेल पत्ताही प्राप्त होतो, ज्यामुळे सेवा प्रदान करण्याच्या प्रक्रियेतील अनेक अडचणी दूर होतात प्रशासनाचे म्हणे आहे 

राज्यातले सरकार हे आपले सरकार म्हणून सांगत असले तरी सदरची साईड बंद अवस्थेत असल्यामुळे ज्या शेतकऱ्याची अंगठा लावून केवायसी होत नाही अथवा आधार मोबाईलला लिंक नाही म्हणून शेतकऱ्यांच्या नावाने आलेली अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या नातेवाईकाच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे म्हणून ऑनलाईन तक्रार केली जाते आहे 

शासनाच्या बेजबाबदार पणामुळे सदरची आपले सरकार केवायसीची साईडच बंद असल्यामुळे ऑनलाईन तक्रार करता येत नाही त्यासाठी शासनानी सदरची महत्वाची साईड तात्काळ चालू करून शेतकऱ्याची गैरसोय टाळावी अशी मागणी केली जात आहे

बघा : आपले सरकारचा अजेब कारभार केवायसीची साईट बंद असल्यामुळे दिसतो १००१ चा आकडा तात्काळ चालू करा ऑनलाईन तक्रारी करण्यासाठी होतोय विलंब होत आहे 

सेवा प्रदान करण्याच्या कामी केवायसी ही एक मूलभूत प्रक्रिया आहे

एखाद्या सेवा केंद्रातील बायोमेट्रिक अधिप्रमाणनाचा वापर करून किंवा संकेतस्थळ अथवा मोबाईल जोडणीचा वापर करून ई-केवायसी ची पूर्तता करता येते असे असताना सुद्धा आपले सरकारची केवायसी साईड बंद का ठेवण्यात आली ते तात्काळ चालू करण्यात यावी अशी संताप जनक होत आहे 


Post a Comment

0 Comments