भारतीय राज्य घटनेचे शिल्पकर तथा भारत रत्न व बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२४ सली भारतात सामाजिक समता आणि लोकशाही समाज व्यवस्था स्थापन करण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली असल्यामुळे नायगाव तालुका समता सैनिक दल प्रशिक्षणाचे दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे
नायगाव समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराच्या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड नायगावच्या महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड राहुल दादा गायकवाड ग्रामपंचायत पंचायत सदस्य देगांव यांच्या अन्य विशेष मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सदरच्या भव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने रुई बु येथील क्रांती सूर्य गायन पार्टीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून पार्टी प्रमुख पत्रकार माधव पवार हार्मोनियम आनंदराव कागडे,हार्मोनियम गणपत पवार नागोराव पवार मुख्य गायक हणमंत वाघमारे गायकवाड मुख्य गायक उत्तम कांबळे शाहीर चंद्रकांत तुकाराम गायकवाड यांचा संचाचा कार्यक्रम होणार आहे
गेल्या शंभर वर्षां पासून समता सैनिक दलाने बहुजन समाजातील युवक युवतींना कठोर सैनिकी शिस्तीत प्रशिक्षित करून स्वाभिमानी व समाजशील सैनिक तयार केले असल्यामुळे त्याच पद्धतीने नायगाव समता सैनिक दल मोठया प्रमाणात कार्यन्वित करण्यात येत असल्यामुळे या सदरच्या कार्यक्रमाला शेकडोच्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजकाने केले आहे
समता सैनिकानी तथागत गौतम बुद्ध महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले शिव छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आणि भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे मानवी कल्याणाचे विचार बहुजन समाजात रुजविण्याचे काम केले म्हणून नायगाव समता सैनिक दल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे
भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करून बहुजन समाजाच्या हिताचे व राष्ट्राच्या एकात्मतेचे संविधानिक मूल्य बहुजन समाजात रुजविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
हे उदात ध्येय ठेवून नायगाव तालुक्यातील युवक युवतीना समता सैनिक दलाचे प्रशिक्षण देऊन बहुजन समाजाला स्वाभिमानी व सक्षम नेतृत्व देण्यासाठी दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी पूज्य भदंत आनंद कौशल्या महाबोधिविहार महाराजा सयाजीराव गायकवाड नगर देगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे एक दिवशीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
या सदरच्या कार्यक्रमाला बहुजन समाज उभारणीच्या व राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून १९जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता उपस्थित राहून मार्गदर्शन करावे असे आवाहन करण्यात आले आहे

0 Comments