Header Ads Widget

पंतप्रधान योजनेचे लाभार्थाना प्रचंड घरकुले मंजूर मात्र रेती मिळेना ? तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यानी उपलब्ध करून द्यावी !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील खेड्या पाडयात पंतप्रधान आवास योजनेसह इतर योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थाना मोठया प्रमाणात शासन घरकुले मंजूर केले आणि घरकुलाचा पहिला हप्ता ही पडला आहे 

तालुक्यातील पात्र लाभार्थाना घरकुल बांधकाम करण्यासाठी लाभार्थाना रेतीच मिळत नसल्यामुळे नायगावच्या तहसीलदारासह गटविकास अधिकाऱ्यानी शासना कडून रेती उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी लाभार्थानी केली आहे 

प्रशासन एका बाजूने गोरगरीब लोकांना आपल्या हक्काचे पक्के घर असावे म्हणून प्रयत्न करीत असले तरी दुसऱ्या लाभार्थाना घरकुल बांधकाम करण्यासाठी रेती देत नाही असे कसे हे सरकार वारे तुझा अजब कारभार ना शेतकऱ्यांना न्याय ना घरकुल धारकांना न्याय अशा पद्धतीचे सदरच्या लाभार्थातुन बोलल्या जात आहे 

नायगावच्या कर्तव्य दक्ष महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांच्यासह नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी लाभार्थाना घरकुल बांधकाम करण्यासाठी रेती उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी जोर धरित आहे

Post a Comment

0 Comments