Header Ads Widget

घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेती उपलब्ध करून देण्यासाठी सरपंच व उपसरपंच ग्रामसेवक यांनी प्रयत्न करावे !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील जवळ पास ८९ गावात पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल असो अथवा रमाई आवास योजने अंतर्गत मिळालेले लाभार्थ्यांना घरकुल असो सदरच्या पात्र लाभार्थ्यांना मंजूर करण्यात आले असून त्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता म्हणून प्रशासन १५००० हाजार रुपये जमा केले आहे 

तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामासाठी गावातील सरपंच व उपसरपंच त्याच बरोबर ग्रामसेवक यांनी प्रशासना कडून घरकुलासाठी मोफत मिळणारी रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लाभार्थ्यां मधून करण्यात येत आहे 

प्रशासन जो पर्यंत घरकुल धारकाकडे लक्ष देत नाही तो पर्यंत घरकुल अर्धवट अवस्थेत राहतील असा शंका निर्माण झाली असली तरी शासनाने बांधकाम करण्यासाठी पहिला हप्ता १५००० हाजार या हिशोबाने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे 

सदरचे बांधकाम करण्यासाठी रेती उपलब्ध नसल्यामुळे शेकडो घरकुलांचे काम अर्धवट अवस्थेत असल्याचे स्पष्ट चित्र तालुक्यातील खेड्या पाड्यात दिसून येत आहे 

गोदावरी पत्रातून चोरीच्या मार्गाने रेती उपसा होत असल्याच्या चर्चा मोठया प्रमाणात होतात तर शासनाची मालमता असलेले गोण खनिज म्हणजे रेती शासन लाभार्थाना का ? देत नाही असा प्रश्न दर वर्षी लाभार्थाना भेडसात आहे 

Post a Comment

0 Comments