Header Ads Widget

दळभद्री सरकारचा भोंगळ कारभार तर कृष्णूरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अजेब कारभार खातेदाराच्या बँक खात्यात बॅलन्स असताना सुद्धा खाते बंद

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अजेब कारभार झाला असून या बँकेत आंधळ जळतोय कुत्र पीठ खातोय अशी गत निर्माण झाल्याचे स्पष्ट चित्र बँक खातेदाराला पहावयास मिळत आहे 

बँकेत खातेदाराचे बँक बॅलन्स असताना सुद्धा सदरच्या खातेदाराचे खाते बंद केले असल्यामुळे खातेदारातून संताप व्यक्त केला जात आहे 

या राज्यातल्या दळभद्री  सरकारच्या कार्यकाळात शेतकरी असो की बँकेचे खातेदार असो अथवा विधवा महिला असो अपंग खातेदाराचे खाते असो अशा खातेदाराचे खाते बंद केल्यामुळे सदरच्या प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे 

तालुक्यातील कृष्णुरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खातेदाराच्या नावाने बँक बॅलन्स असताना सुद्धा सदरच्या यंत्रणेने बँक खातेदाराचे खाते बंद करून त्यांना पॅन कार्ड आधार कार्ड बँकेचे पास बुक बँकेत आणून दिल्या शिवाय सदरचे खाते खोलता येत नाही म्हणून पाठवून देत आहे 

प्रशासनाच्या सदरच्या ठिसाळ नियोजनामुळे बँक खातेदारासह शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना सदरच्या बँके मध्ये करावा लागत असल्याचे स्पष्ट चित्र पहावयास मिळत आहे 

सदरच्या बँक खात्याच्या खातेदाराचे अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने व बँक यंत्रणेने तात्काळ खाते चालू करून बँकेचा सुरळीत व्यवहार ठेवावा अशी मागणी खातेदारातून केली जात आहे

Post a Comment

0 Comments