Header Ads Widget

हिमायतनगर पोलीस ठाणे आरोपी कडून दोन तलवार एक खंजर देशी व विदेशी दारू अशी एकूण ३६ हजार ४६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त !!

       नागोराव शिंदे 
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक भोकर खंडेराय धरणे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव शपकत अमना उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी दमदार कामगिरी केली आहे 

सदरील प्रकरणातील आरोपीचे नाव शेख जिलानी शेख बाबा नगर खडकी बाजार हिमायतनगर वसंत अमरसिंग राठोड खडकी बाजार हिमायतनगर रोहित वसंत राठोड खडकी बाजार हिमायतनगर तानाजी सदाशिव सोळंकी खडकी बाजार हिमायतनगर यातील पाहिजे असलेले आरोपी राजू जयस्वाल गजानन जाधव हे आरोपी आहेत 

        सदरील गुन्ह्याची थोडक्यात माहिती 

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन प्लस आउट अंतर्गत हिमायतनगर मध्ये अवैध धंद्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक सनांदेड यांनी सदर अवैध धंद्यावर कारवाई करणे बाबत श्रीमती शपकत अमन उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर यांनी एक विशेष पथक तयार करून कारवाई कामी आदेशित केले होते 

त्या अनुषंगाने २२ जानेवारी २०२५  रोजी श्रीमती शपकत अमन उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर व पथक तसेच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत हिमायतनगर व पथक असे पथक तयार करून छापा मारला सदरची कारवाई ही खालील प्रमाणे संयुक्त कारवाई करण्यात आली आहे 

आरोपी क्रमांक १ आरोपी नामे वसंत अमरसिंग राठोड २ रोहित वसंत राठोड ३ अक्षय लक्ष्मण राठोड खडकी बाजार तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड यांचे वज्रधारी धाबा हिमायतनगर येथून विदेशी दारूच्या ८७ बाटल्या त्यांची किंमत १३,९२० व रोख रक्कम  १२१५० रुपये अशी एकूण २६०७० रुपये किमतीची मालमत्ता मिळून आल्याने हिमायत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments