Header Ads Widget

कृष्णूर युनिट अंतर्गत येणाऱ्या रुई बु गावासह अन्य गावात अंधार मुक्त गाव करण्यासाठी सहाय्यक अभियंता डी एम जाधव प्रयत्न करणार !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कृष्णूर युनिट अंतर्गत असलेल्या गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करून कायम स्वरूपी अंधार मुक्त गाव करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक 
अभियंता डी एम जाधव यांनी मोठे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे 

परंतु विद्युत वितरण कंपनीला ग्राहकाने सहकार्याची भावना ठेवून घरगुती विद्युत मीटर घेतले तरच अंधार मुक्त गाव करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सहाय्यक अभियंता यांनी सांगितले आहे 

घरगुती विद्युत मीटर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक तयार असून सदरच्या मीटरची रिडींग घेण्यासाठी गुत्तेदाराच्या कर्मचाऱ्या मार्फत घेण्यात येऊ नये कारण सदरचे कर्मचारी विद्युत मीटरला न बघता त्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकाला जास्तीची बिल देत आहेत 

सदरची बिल ग्राहकांना भरणे होत नसल्यामुळे घरगुती विद्युत कनेक्शन तोडण्यात येत असून हे कुठे तरी थांबले पाहिजे सदरच्या गुत्तेदाच्या कर्मचाऱ्याच्या मार्फत  देण्यात असलेले बिल ग्राहकांना जास्तीची रक्कम भरणे होत नसल्यामुळे कनेक्शन तोडल्या जाते व ग्राहक विद्युत मीटर घेण्यासाठी धजावत नाही असे स्पष्ट नूतन ग्राहकांचे म्हणणे आहे 

तालुक्यातील कृष्णुर युनिट अंतर्गत असलेल्या गावा मध्ये सिंगल फेज डी.पी. रात्रीच्या वेळी व दिवसा ढवळ्या विद्युत चोरीअकोडे टाकून केली जात असून सदरची बाब गंभीर पद्धतीची असल्यामुळे सदरच्या डी पी वर लोड येऊन सिंगल फेजच्या डी.पी जळत असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही जनतेच्या सेवेसाठी २४ तास लाईट देते परंतु कोणत्याच गावात अपेक्ष नुसार घरगुती विद्युत मीटरचे कनेक्शन नाहीत विद्युत मीटरचे बिल कोट्यावधी रुपयाच्या जवळपास थकले असताना सुद्धा विद्युत वितरण कंपनी कधीच कुचराई न करता गावाला विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी माजे कर्मचारी रात्री बे रात्री गावात लाईट सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे

कृष्णुर शाखा युनिटचे सहायक अभियंता डी.एम जाधव यांनी असे सांगितले की ग्राहकाने अभय योजनेचा लाभ घेणे गरजेजे असून कायम स्वरूप विद्युत पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकाने ( पी डी ) सदरचा लाभ घेऊन विद्युत वितरण कंपनीसह आमच्या कर्मचाऱ्याला बिले भरून सहकार्य करावे असे आवाहन ही यावेळी केले केले आहे 

येत्या पाच ते सहा महिन्यां मध्ये कृष्णूर युनिट अंतर्गत
असलेल्या गावां मध्येअंधार मुक्त गाव करणार असून प्रत्येक गावा मध्ये सदरच्या ग्राहकाने कमीत कमी ८५ टक्के तरी घरगुती विद्युत मीटर घेतले पाहिजेत व घ्यावीच लागेल तरच अंधार मुक्त गाव होईल असे स्पष्ट त्यांनी बोलून दाखवले आहे

Post a Comment

0 Comments