सध्याच्या परिस्थिती मध्ये या वर्षातील पहिला महिना म्हणजे जानेवारी २०२५ चालू असल्यामुळे हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागत असल्यामुळे प्रशासनाने उन्हाळया पूर्वी उपाय योजना कराव्यात असे सदरील जनतेतून बोलल्या जात आहे नायगाव तालुक्याच्या खेड्यापाड्यातील नागरिकांच्या पाणीटंचाई संदर्भामध्ये नायगावच्या तहसीलदारासह पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यानी सदरच्या बाबतीत पाणी टंचाई आराखडा बैठक कधी घेणार असा जनतेतून सवाल केला जात आहे येणाऱ्या उन्हाळ्या मध्ये नायगाव तालुक्याच्या खेड्या पाड्यातील पाणी टंचाईच्या संदर्भात लोकप्रतिनिधीच्या उपस्थिती मध्ये पाणी टंचाई आराखडा बैठक पाणी टंचाईच्या अगोदर जर बैठक घेऊन पाण्यावर मात करण्यासाठी नायगाव तहसीलदार असो की नायगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी असो येणाऱ्या उन्हाळ्याच्या पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावेत असा सवाल जनतेतून केला जात आहे
महाराष्ट्र शासनाने खेड्या पाड्यात हर हर नल योजना करण्यासाठी व प्रत्येकांच्या घरी या योजनेच्या माध्यमातून पाणी मुबलक नागरिकांना मिळाले पाहिजे या मूळ हेतूने शासन प्रयत्न करीत असले तरी अनेक गावात या सदरच्या योजनेचा चांगलाच बोजवारा उडाला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
गेल्या वर्षा पासून व त्यापेक्षा काही वर्षा पासून अनेक गावात सदरच्या योजनेच्या संदर्भात नागरिकांना उन्हाळ्या मध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून सदरच्या योजने अंतर्गत विहिरी खोदण्यात आल्या टाकीचे बांधकाम काही गावात पूर्ण झाले आहे
काही गावात टाकीचे व विहिरीचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांना अद्याप या योजने अंतर्गत पाणी मिळालेच नाही असे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे
हर हर नळ योजना पूर्ण करण्यासाठी सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक प्रयत्न करीत असले तरी या कामाच्या संदर्भात गुत्तेदाराला सदरचे काम दिल्यामुळे गुत्तेदारा कडून काम करण्यासाठी मोठी टाळाटाळ होत आहे
अनेक गावांतर्गत पाईप लाईन खोदून गावातील कोठ्यावधी रुपयाचे रस्ते नादुरुस्त बनले आणि सदरच्या योजनेचे पाणी नागरिकाला मिळतच नाही हे मात्र मोठी गंभीर बाब आहे

0 Comments