Header Ads Widget

बरबडा जेष्ठ कै दिगांबर गंगाराम पाटील शेवाळे यांचे आज निधन उद्या १७ रोजी २ वाजता अंत्यविधी !!

     माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील रहिवासी असलेले जेष्ठ नागरिक कै.दिगांबर गंगाराम पाटील शेवाळे यांचे दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ५ वाजता निधन झाले ते ९२ वर्षाचे होते 

तालुक्यातील मौजे बरबडा येथील जेष्ठ नागरिक कै. दिंगाबर गंगाराम पाटील शेवाळे यांना चांगला जोतीषाचा अभ्यास होता त्यांना माननारा चांगला वर्ग असून बरबडा येथे त्यांच्या पुढाकारातून दत्त मंदिराची ही स्थापना करण्यात आलेली आहे

ते दतात्र्याचे निच्छिंत भक्त होते त्यांच्या जान्याने सर्वांच्या मनात दु:ख झाले असून त्यांच्या पश्चात पत्नीचार मुल  एक मुलगी,नातु पनतु असा मोठा परिवार आहे

बाबा ढग येतात पण पाऊस पडत नाही,आठवणी येतात पण तुमच्या चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, सांग बाबा मी तुला कसे विसरू बाबा तुमच्या शिवाय एक ही दिवस माझा जात नाही बाबा आज ही तुमच्या मायेची उब मला जाणवते हिच बाबा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत 

भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गोविंद दिगांबर पाटील शेवाळे व सुधाकर दिगांबर पाटील शेवाळे जिल्हा अध्यक्ष अपंग कर्मचारी अधिकारी संघटना नांदेड साहेबराव दिगांबर पाटील शेवाळे व रूपेश दिगांबर पाटील शेवाळे सदस्य सेवा सहकारी सोसायटी बरबडा यांचे ते वडिल होते 

बरबडा येथे त्यांच्यावर अंत्यसंसार दिनांक १७ जानेवारी २०२५ शुक्रवारी रोजी दुपारी २ वाजता करण्यात येनार आहे

Post a Comment

0 Comments