Header Ads Widget

नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे मोठे योगदान - एक नजर पोलिसाकडे !!

       माधव पवार 
नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची सुपर पावर पोलीस अधिकारी म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात म्हणजे अनेक जिल्हात त्यांची ओळख असल्यामुळे नांदेड जिल्हाचा त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्विकारला तेव्हा पासून जिल्हात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार यांचे मोठे योगदान आहे 

जिल्हाचा कारभार सांभाळत असताना सर्व पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याकडे करडी नजर त्याच बरोबर गुंडगिरी करणाऱ्या गुंड वर्तीला जास्तीचा म्हणजे कायमचा आळा बसविण्यासाठी स्वता रस्त्यावर येत आहेत 

या जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार हे रस्त्यावर येऊन पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याकडे नजर टाकतात म्हणूनच या जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सक्षम पणे काम करीत आहेत 

जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रम असो अथवा महापुरुषाच्या जयंतीचा भव्य सोहळा असो सर्वजनिक गणेशोत्सव असो अथवा बकरी ईद असो रमजान ईद असो अशा कार्यक्रमाच्या उत्सवाच्या निमित्ताने कडेकोट बंदोबस्त ठेवून सदरचे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहे 

नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे  योगदान असल्यामुळे त्यांची एक नजर पोलिसाकडे  आहे 

Post a Comment

0 Comments