नांदेड जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री अतुलजी सावे यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या समस्याचे पालन करून गेल्या एक ते दीड वर्षा पासून तमाम शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजना व मुख्यमंत्री योजनेचे व पीक विमा शेतकऱ्याचे अंगठे येत नसल्यामुळे सदरच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठया अडचनीचा सामना करावा लागत आहे पंतप्रधान व मुख्यमंत्री व पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यात शेतकऱ्याची केवायसी व मोबाईलला आधार लिंक व अंगठा येत नसल्यामुळे ओटीपीवर आणि डोळ्यावर सुद्धा केवायसी होत नाही अशा शेतकऱ्याचे तात्काळ सर्वे करणे आवश्यक आहे
जिल्हा कृषी अधिकाऱ्यानी आपल्या कृषीसहाय्यकाच्या माध्यमातून चौकशी करून सदरच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना सुद्धा यांनी शेतकऱ्या कडे लक्ष देत नाहीत असा शेतकऱ्याचा स्पष्ट दावा आहे
आपले सरकार केवायसी साईट बऱ्याच दिवसा पासून बंद असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रारी करण्यासाठी मोठा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे या जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री अतुलजी सावे या कडे ही लक्ष देतीला का प्रश्न जनसामान्य माणसाला भेडसावत आहे
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अतुलजी सावे यांनी शेतकऱ्याच्या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन केवायसी विना शेतकऱ्याच्या बँक खात्यात पंतप्रधान सन्मान योजना व मुख्यमंत्री योजना व पीक विमा शेतकऱ्यांना केवायसी झाली नसल्यामुळे जमा होत नाही त्या साठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना या बाबीची चांगली जाणीव असताना सुद्धा यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत तोडगा काढण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही अशी गत निर्माण झाली असून शेतकऱ्याचा अंगठा येत नसल्यामुळे सदरची रक्कम जमा होत नाही ही संताप जनक बाब आहे
आपले सरकार केववायसी साईट तात्काळ चालू करा - शेतकऱ्याचा अंत पाहू नका असा संताप जनक सवाल शेतकऱ्यानी केला आहे

0 Comments