पूर्णा तालुक्यातील गणपूर-ममदापूर शिवारातील रेल्वे पटरी शेजारील एका शेत आखाड्यावरील एका गाईच्या छोट्या वासराची मध्यरात्रीच्या सुमारास कोणत्यातरी अज्ञात हिंस्र पशुने शिकार केल्याचे मंगळवारी सकाळच्या सुमारास निदर्शनास आले आहे सदरील गाईच्या वासराची बिबट्यानेच शिकार केली असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले होते
सदरील घटनेला दोन दिवस उलटतात की तेच आज शुक्रवार दि. ३० जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील पुनर्वसीत निळा गावालगतच्या कानडखेड शिवारातील गट क्रमांक ३५९ ते गट क्रमांक ३६३ या परिसरातील शेतकरी साहेबराव नारायणराव सुर्यवंशी यांच्या आखाड्यावरील शेळीसह करडूवर बिबट्यानेच हल्ला करुन शिकार करीत जिवे मारल्याचा गंभीर प्रकार समोर आले आहे
आधिक माहीती आशी की साहेबराव नारायणराव सुर्यवंशी यांच्या आखाड्यावर त्यांचा मुलगा गुलाब साहेबराव सुर्यवंशी हा आखाडावर राहात असतो गुलाब सुर्यवंशी यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली आहे
त्यांनी देखील सागले आहे की शेळी व करडुवर बिबट्यानेच हल्ला केला आहे या घटनेवरून असे निदर्शनास येते की पुर्णा नदीकाठावरील गावांमध्ये सर्वत्र बिबट्याचा संचार होत असून शेतकऱ्यांच्या शेत आखाड्यांवरील पाळीव प्राण्यांना बिबट्या लक्ष बनवत आहे
त्यामुळे परिसरातील गावांतील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे

0 Comments