Header Ads Widget

मांजरम नगरीचे दिवंगत माजी आमदार गणपतराव माणिकराव वाघमारे एक नायगाव तालुक्यासाठी अभिमान तर यांचा फोटो केशव पाटील शिंदे यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना धन्यवाद !!

         माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम नगरीचे दिवंगत माजी आमदार गणपतराव माणिकराव वाघमारे एक नायगाव तालुक्यासाठी अभिमान तर यांचा फोटो केशव पाटील शिंदे यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने धन्यवाद देण्यात येत आहे 

मांजरम येथील भूमिपुत्र दिवंगत माजी आमदार गणपतराव माणिकराव वाघमारे हे सामाजिक कार्य करीत असताना समाजाची आर्थिक प्रगती कशी होईल ह्या कडे त्यांचे सातत्याने लक्ष होते. त्या काळात हैद्राबाद राज्यात श्री बी.एस. व्यंकटराव ,श्री सुबेय, श्री श्यामसुंदर यांनी शेड्युलकास्ट संघटना स्थापन केली होती 

स्व.माजी आमदार गणपतराव वाघमारे यांनी सामाजिक व राजकीय चळवळीत वंचित,दलित गोर गरिबांच्या प्रगती साठी कार्य केल्याचे योगदान आहे 

महाराष्ट्र २७ मार्च १९५२ साली देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर  नायगाव तालुक्यातील मांजरम नगरीचे भूमिपुत्र दिवंगत गणपतराव माणिकराव वाघमारे हे देगलुर 'राखीव मतदार संघातून बहुसंख्य मतांनी निवडून आले होते व मुंबई विधान परिषदेत वंचित दलित. बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व केले होते 

Post a Comment

0 Comments